कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार – Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi

जगात चालू असलेल्या एक नव्या भीतीची चर्चा फारच वाढत चालली आहे. ती भीतीची चर्चा म्हणजे जगत निर्माण झालेला हा कोरोना व्हायरस. ज्याला वैज्ञानिक भाषेत COVID-१९ म्हटले जाते.

काही दिवसांपूर्वी हा व्हायरस चीन मधे आढळून आला. हा व्हायरस पहिल्यांदा चीन देशात असलेल्या वुहानमधील सीफूड आणि मीट मार्केटमधून आला. या व्हायरस मुळे चीन येथे अनेकांनी जीव गमावले आहे.

यानंतर या कोरोना व्हायरस चे प्रमाण भारत सह इतर देशांमधे वेगाने पसरत आहे. कोरोना व्हायरस मुळे आजवर मृतांची संख्या ४२९१ पर्यन्त पोहचली आहे.

कोरोनाव्हायरस म्हणजे काय? What is Coronavirus?

कोरोना वायरस हा असा व्हायरस आहे जो प्राण्यांमधे आढळून येतो. आणि काही प्रमाणात तो प्राणी मधून माणसांना होतो. आणि मग तो एका व्यक्तितुन दुसऱ्या व्यक्तित पसरतो.

मानवांमध्ये, अनेक कोरोना व्हायरस हा सामान्य सर्दीपासून मध्य-पूर्व श्वसन सिंड्रोम (एमईआरएस) आणि गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (एसएआरएस) यासारख्या गंभीर रोगांमधे श्वसन संक्रमण होण्यास कारणीभूत असतात.

सर्वात अलीकडे सापडलेल्या कोरोना व्हायरसमुळे COVID -19 होतो.

कोरोनाव्हायरसची लक्षणे कोणती? Coronavirus Symptoms In Marathi

कोरोना व्हायरस ची लक्षणे ही गंभीर प्रकारत असतात. ह्या वायरस ला आपली लक्षणे दर्शवण्यात २ ते १४ दिवस लागतात.

World Health Organization (डब्ल्यूएचओ) च्या मते, कोरोना व्हायरस छे लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

  • कोरडा खोकला
  • ताप येणे
  • थकवा
  • श्वास लागणे
  • घसा खवखवणे
  • वाहणारे नाक

वरील दिलेली लक्षणे ही सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही वेळेस ही लवकर लक्षणे समजून येत नाहीत.

कोरोना व्हायरसला काय कारणीभूत आहे? Coronavirus Causes In Marathi

कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार - Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi
Coronavirus Causes In Marathi

कोरोना वायरस हा प्रथम प्राण्यांच्या संपर्कातुन मानवांना होतो. यानंतर हा व्हायरस एक मनुष्या पासून दुसऱ्या मानवांना होतो. COVID -१९ हा व्हायरस नेमका कोणत्या प्राण्यांमुळे मनुष्यात पसरला आहे हे अजुन कळलेले नाही.

COVID -१९ हा व्हायरस हा संपर्काद्वारे पसरतो. हा व्हायरस थेंबासारख्या द्रवांच्या स्वरुपात खोकल्याद्वारे पसरतो. एखाद्या कोरोना व्हायरस असलेल्या व्यक्तीने स्पर्श केलेल्या एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यामुळे आणि नंतर तोच हात आपला तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यामुळेही हा व्हायरस शकते.

कोरोनाव्हायरसचे निदान कसे केले जाते?

जर तुम्हाला कोरोना व्हायरस असल्याची शंका असल्यास तुम्ही ताबडतोब आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा.

फॅमिली डॉक्टर तुम्हाला पुढे काय करावे याबाबत सल्ला देतात. आपले निदान करण्यासाठी, डॉक्टर तुमच्या काही चाचण्या करतील व इतर इन्फेक्शन होण्यापासून थांबवतील. तसेच तुम्हाला एकांतात राहण्याचा सल्ला देतील.

कोरोनाव्हायरस टाळता येतो का?

कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार - Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi
Coronavirus Treatment In Marathi

जे लोग आजारी आहेत अश्या लोकांसोबत भेटण्याचे टाळा. आणि जर आपण आजारी असल्यास घरीच रहायचा प्रयत्न करा.

नेहमी खोकलतांना हाथरूमालाचा वापर करावा. प्रयत्न करा की आपल्या हातावर खोकला जाऊ नका.

नेहमी खाण्यापूर्वी, स्नानगृहात जाण्यापूर्वी, खोकला किंवा शिंका आल्यानंतर आपले हाथ कमीतकमी 20 सेकंद साबणाने आणि पाण्याने आपले हात धुवा. पाणी उपलब्ध नसेल तर सॅनिटायझर चा वापर करा.

आपल्या हाताचा तोंड, नाक किंवा डोळे सोबत स्पर्श करणे टाळा.

कोरोनाव्हायरस उपचार Coronavirus Treatment In Marathi

कोरोना व्हायरस COVID -१९ वर सध्या कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही.

जर तुम्हाला जास्त प्रमाणात सर्दी असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टर तुम्हाला त्रास कमी करण्याच्या औषधे लिहून देतील.

दररोज भरपूर प्रमाणात पाणी किंवा द्रव प्या आणि भरपूर विश्रांती घ्या.

जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास जाणवत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सेवा घ्या.

जर तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार – Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या मित्र, परिवार मधे शेयर करा.

कोरोनाव्हायरसची लक्षणे, कारणे, उपचार – Coronavirus Symptoms, Causes, Treatment In Marathi बद्दल कोणतीही शंका असल्यास खालील कमेंट बॉक्स येथे विचारा. MarathiJunction आल्याबद्दल धन्यवाद्.

Leave a Comment